ऍक्शन’(Action) हाय अँकल ट्रेकींग शूज - सह्य-भ्रमंती

ताजे-तवाने

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, September 11, 2012

ऍक्शन’(Action) हाय अँकल ट्रेकींग शूज

ट्रेकिंगची मुळात आवड असल्याने मी जवळ जवळ सर्वच शनिवार, रविवार बाहेरच असतो. 'रॉक क्लाईम्बर्स क्लब' आणि 'गोरिला एडव्हेन्चऱ्स' हे दोन्ही ग्रुप्स मी सांभाळत असल्याने चांगल्या प्रतीच्या गिर्यारोहणाच्या वस्तू घेण्यास मी सुरुवात केलीय. माझे स्वतःचे सुरुवातीचे ट्रेक्स मी चक्क फ्लोटर्स वापरून केले आहेत. बाटाची डीस्ट्रीब्युशनशिप असणारे ‘वेनब्रेनीअर’चे सँडल/शूजसुद्धा ट्रेकींग दरम्यान चांगली पकड (ग्रीप) देतात. परंतु मातीच्या चिखलातून चालताना मात्र त्या कुचकामी ठरतात; हा अनुभव मी कळसूबाई शिखराच्या ट्रेकला घेतला आणि मग चांगले ट्रेकींग शूज घेण्याचे ठरवले.

मात्र आता मी मोठ्या पेचात फसलो होतो. कारण बाजारात अनेक चांगले ट्रेकींग शूज उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात ‘केचुआ’ कंपनीचे ‘वेंटीव ५००’ शूज चांगले वाटले. मुख्य म्हणजे ते माझ्या बजेटमध्ये होते. त्यानंतरही 'रॉक क्लाईम्बर्स क्लब'चा गोरखगडाचा ट्रेक मी घेऊन गेलो होतो. त्यात अनेकांच्या पायात मी ‘ऍक्शन’(Action) कंपनीचे ‘ट्रेकींग’शूज पहिले. त्यांचा ‘रिव्हु’ मी वापरणाऱ्यांना विचारला. निरंजन नावाच्या माझ्या मित्रानेही तेच शूज घातले होते. त्याचेही त्या शुजच्या बाबतीत चांगले मत होते. मी इंटरनेटवर ‘सर्च’ केलं परंतु अधिक माहिती मिळाली नाही. मग सरळ दुकानात विचारपूस सुरु केली. ‘अरे साब, ट्रेकींगके लियेही ये शूज कंपनीने बनाया है | बहुत लोग लेके जाते है | और ये सस्ता भी है |’ सगळेच दुकानदार जवळपास हाच सल्ला देत होते. ‘त्यांना काय, शूज विकायचेच आहेत. म्हणून काहीही सांगतायत..’ मला वाटलं. पण विचार करण्याची गोष्ट होती की फक्त ८०० रुपयात ते ट्रेकींग शूज होते, ते सुद्धा दोन प्रकारात. एक ‘हाय अँकल’ आणि 'लो अँकल’. आम्ही सगळीच ट्रेकर्स खर्चाच्या बाबतीत थोडे कंजूस असतो. ;) पण इथे सुरक्षेचा प्रश्न होता. शूज चांगली पकड घेणारे नसतील तर डोंगर-उतारांवर ते धोकादायक होऊ शकतात. त्यामुळे इथे पैशाला झुकतं माप देऊन चालणार नव्हतं. तरीसुद्धा म्हटलं ट्राय करून पाहू. आधी लहान ट्रेकसाठी वापरून पाहू. नाहीतर रोजच्या वापरासाठी शहरातही वापरत येईल. शेवटी ते ऍक्शनचे ‘हाय अँकल’ ट्रेकींगशूज घेतलेच. दोन तीन दिवस त्याची ‘कम्फर्टेबिलीटी’ पाहण्यासाठी ते रोज वापरून पाहिले

 
त्यापुढील ट्रेक होता. अवचितगड. साधा सोपा ट्रेक. पण वाटेत घसारे, ओढे, शेवाळलेले कातळ, मातीचा चिखल सर्व काही समोर येणारं होतं. म्हटलं ‘उत्तम!’. शूज चेक करायला हा चांगला ट्रेक आहे. मित्रांनो, हे शूज ह्या ट्रेकला वापरल्यानंतर, मला आपल्याला सांगायला आनंद होईल की संपूर्ण ट्रेकदरम्यान ह्या शूजनी उत्तम प्रदर्शन दिले. सर्व ठिकाणी त्यांची पकड उत्तम होती. (फक्त शेवाळलेले निसरडे कातळ जपून चालल्यास अधिक उत्तम). ‘कम्फर्ट’ म्हणाल तर पायाला चांगल्या पॅडिंगमुळे जास्त त्रास होत नाही. बऱ्याचअंशी ते ‘वॉटरप्रुफ’ सुद्धा आहेत. घोट्यापर्यंत (हाय अँकल) असल्यामुळे पाय मुरगळणे वगैरे प्रकारही कमी होतात. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते खिशाला परवडणारे आहेत. या शूजचे गुण आणि उणीवा (माझ्या अनुभवांवरून) खाली नमूद केल्या आहेत.

गुण:

या बुटाला उत्तम पकड (ग्रीप) मिळते. एकच संपूर्ण सोल, उत्तम प्रतीचे मोल्डिंग या बुटाला आहे. कॅनव्हास शूज पेक्षा जाड शूज मटेरीअल व त्यात उत्तम पॅडिंग असल्यामुळे पायावर चढता / उतरताना होणाऱ्या आघाताचा त्रास कमी होतो. बुटाला लेस असल्याने आवश्यकतेनुसार घट्ट व सैल करता येण्याची सोय आहे. या शूजमध्ये आतल्या बाजूस टाचेखाली 'शॉक ऍबसोर्बर' सारखी प्रणाली (सिस्टीम) वापरली आहे. या आतील एअर पंपमुळे पायाना हवा लागत राहते जी लांब पल्ल्याच्या ट्रेकसाठी आवश्यक गोष्ट आहे. वजनाने हलके असल्यामुळे सॅकमध्ये टाकल्यास जास्त वजन होत नाही. दिसायला आकर्षक असून ३ रंगामध्ये (काळा, ब्राऊन, ओलिव्ह ग्रीन) बाजारात उपलब्ध आहेत. जमिनीपासून ३ इंचापर्यंत खोल पाण्यात (म्हणजे बुटाला बोटांच्यावर असलेल्या जाळीपर्यंत) ते वॉटरप्रुफ आहेत. घोट्यापर्यंत (हाय अँकल) शूजमध्ये पाय मुरगळण्यापासून, किडे-कीटक-विंचू दंशापासून बचाव होतो. चांगले वापरल्यास अनेक वर्षे हे शूज वापरणारी मंडळी मी पाहिली आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे उत्कृष्ट किंमत व भारतीय कंपनी.

उणीवा:

या बुटाचा एक त्रास म्हणजे त्यातील 'इनसोल'. तो लवकर खराब होतो. म्हणजे पावसाळी किंवा मोठ्या ट्रेक दरम्यान (प्रामुख्याने उतारावर) तो आतल्या आत गुंडाळला / दुमडला जातो. त्यामुळे तो अश्या ट्रेकनंतर निकामी होतो व बदलावा लागतो. पण इनसोल २० - ३० रुपयांमध्ये मिळत असल्याने तो खर्च परवडण्यासारखा आहे. जमिनीपासून ३ इंचापर्यंत खोल पाण्यात (म्हणजे बुटाला बोटांच्यावर असलेल्या जाळीपर्यंत) ते वॉटरप्रुफ आहेत, मात्र त्यापेक्षा वर पाणी असल्यास (ओढे, ओहोळ इत्यादींमध्ये) त्या जाळीतून पाणी शिरून पाय ओला होतो. पण इतर अनेक ब्रँडेड बूटही अश्या ठिकाणी आतून ओले होतात.

निष्कर्ष:

मी सह्याद्रीपुरता विचार करत असल्याने सह्याद्रीत हिंडण्यासाठी हे शूज उत्तम आहेत हे माझे वैयक्तिक मत 'कन्फर्म' झाले आहे. सल्ला म्हणून तुम्हालाही सांगू शकेन की एकदा वापरून पाहायला हरकत नाही, तुमची निराशा अजिबात होणार नाही.. J

नोंद: ही माहिती, मी माझ्या दुसऱ्या एका ब्लॉगवर, ११ सप्टेंबर २०१२ रोजी प्रसिद्ध केली होती. पण 'सह्यभ्रमंती' ब्लॉगला भेट देणाऱ्या वाचकमित्रांची संख्या पाहून या ब्लॉगवरही, ही माहिती देणे आवश्यक वाटले, त्यामुळे हा खटाटोप.. साधे सोपे नियम पाळा, सह्याद्रीतील अपघात टाळा.. :) 

17 comments:

  1. उत्कर्ष, माझे मत थोडेसे वेगळे आहे. हे शूज शेवाळलेल्या कातळावर सुद्धा चांगली ग्रीप देतात. मी त्यांचा अनुभव बर्‍याच ट्रेक मध्ये घेतला आहे. माझ्या बरोबर असलेले ज्या शेवाळ असलेल्या कातळावर उभे राहू शकत नव्हते तिथे मी अगदी सहज रित्या उभा होतो. शूज वन पीस असल्याने सोल वेगळा होत नाही. नेहमी ट्रेक मध्ये आपल्याला बाजूला असे वेगळे सोल पडलेले दिसतात.आणि या मध्ये आपल्या नेहमीच्या साइज पेक्षा एक साइज मोठी असेल तर मग पायांच्या बोटाला अगदी आराम मिळतो.

    ReplyDelete
    Replies
    1. मित्र विनय, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.. हो मीही या मताशी सहमत आहे. नक्कीच मी इतर चांगले शूज वापरून पहिले नाहीत पण हे शूज घेतल्यामुळे इतर असे शूज वापरण्याची गरज वाटली नाही हे मात्र खरे.. प्रत्येकाच्या चालीवर ग्रीप अवलंबून असते असेही अनेक ट्रेकर्स म्हणतात पण हे शूज चांगली ग्रीप घेण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवतात हे ही तेवढेच खरे.. कॅनव्हास शूजही मी आधी वापरले आहेत पण त्यातील कापड काहीसे नरम असल्याने पाय पुढे ढकलला जाऊन बोटे सुजतात हा अनुभव घेतला आहे. म्हणून पॅडिंग असलेले हे एक्शन शूज नक्कीच सल्लादायक आहेत..

      Delete
  2. माझ्या भावाने हिमालयात सरपासच्या ट्रेकला सुद्धा वापरले आहेत आणि काहीसुद्धा त्रास नाही. त्यामुळे फक्त सह्याद्रीतच नाही सगळीकडेच बेस्ट आहेत.
    मी तर सगळ्या सिझनमध्ये वापरले आहेत. या किंमतीत अत्युकृष्ट..
    फक्त एकच म्हणजे इनर सोलची लवकरच वाट लागते. आणि मला तर एखादा जंबो झाला की टाकूनच द्यावे लागतात.
    ते सोडल्यास एकदम टिकाऊ आणि मस्त

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद आशिष, आपल्या माहितीप्रमाणे मलाही हा अनुभव आला आहे. त्यामुळे तो मी ह्या माहितीमध्ये अपडेट केला आहे.

      Delete
  3. Hi I have also used it,but after 6-7 months grip not so useful... also sometimes blisters come when used for 5-6 hours in constant...

    ReplyDelete
  4. मित्र विनय, प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.. हो मीही या मताशी सहमत आहे. नक्कीच मी इतर चांगले शूज वापरून पहिले नाहीत पण हे शूज घेतल्यामुळे इतर असे शूज वापरण्याची गरज वाटली नाही हे मात्र खरे.. प्रत्येकाच्या चालीवर ग्रीप अवलंबून असते असेही अनेक ट्रेकर्स म्हणतात पण हे शूज चांगली ग्रीप घेण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवतात हे ही तेवढेच खरे.. कॅनव्हास शूजही मी आधी वापरले आहेत पण त्यातील कापड काहीसे नरम असल्याने पाय पुढे ढकलला जाऊन बोटे सुजतात हा अनुभव घेतला आहे. म्हणून पॅडिंग असलेले हे एक्शन शूज नक्कीच सल्लादायक आहेत..

    ReplyDelete
  5. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद आशिष, आपल्या माहितीप्रमाणे मलाही हा अनुभव आला आहे. त्यामुळे तो मी ह्या माहितीमध्ये अपडेट केला आहे.

    ReplyDelete
  6. I also agree with you. I have been using Action trekking shoes since 4 years. Perfect for sahyadri trekking!!!

    ReplyDelete
  7. Hi,

    Thanks for writing a blog on shoes for trekking. It is a very important topic which is not given its due importance.

    I personally used Action Trekking(with and without ankle) for many years. The shoes are good but only untill the insole remains in place. Once the sole is loosened up, the inside part of the bottom of the shoe(which touches our feet) hurts badly. So usually after about 4 hours of a hike in a very rainy condition, the in sole crumbles up and accumulates to one of the corners.

    Another problem with the shoes is that they tend to provide very less cushioning after a number of treks in the rainy season - especially heavy treks with longer routes.

    My view on the requirement of shoes for trekking:

    The shoes to be worn in Sahyadris should be flexible - meaning that the outsole should be very soft - it should take the shape of the rock/earth that it lands on and provide maximum friction for grip. One such brand was Kelachandra. These were amongst the worst looking shoes - appeared similar to Canvas shoes but the sole was a very flexible rubber. They were only available in pune(tilak sports and Deo sports). Now the company has stopped their production.

    I have tried our good old canvas shoes as well. they are sometimes good(provided you are a well versed trekker and know your footing well).

    My search for the perfect shoes is still on .....!!!!!

    ReplyDelete
  8. I even used these shoes in Himalaya for full NIM course...

    ReplyDelete
  9. माझ्याकडे पण Action चे हेच ट्रेकींग शूज आहेत..गेली ४ वर्षे वापरत आहे.एकदम कम्फ़र्टेबल आणि रिजने

    ReplyDelete
  10. नमस्कार उत्कर्ष .….!!

    माहिती बद्दल धन्यवाद . मला सांगा, Quechua Foreclaz ३००/५०० ची पकड चांगली आहे का Action Trekker ची ?

    -अनिकेत आपटे

    ReplyDelete
  11. अनिकेत, मी स्वतः केचुआ वापरले नाही आहेत.. त्यामुळे त्यावर बोलण्याचा हक्क नाही.. मात्र ज्यांनी ते वापरले आहेत, त्यांच्या सल्ल्यानुसार या दोन्ही बुटांत किमतीचा काय तो फरक आहे.. मी स्वतः ऍक्शन ट्रेकरची पकड अनेक ठिकाणी अनुभवली आहे त्यामुळे माझ्या मते त्याचीच पकड जास्त चांगली आहे.. किमान सह्याद्रीसाठी ते उत्तम शूज आहेत
    ..

    ReplyDelete
  12. उत्कर्ष मी आपल्या या मताशी पूर्ण सहमत आहे.
    Action
    Treeking चे हे शूज फारच छान आहेत. मी १० वर्षे हे शूज सह्याद्रीत
    वापरले. ब-याचवेळा ऑफिसलाही वापरले. २६ जुलै २००५ च्या तुफानी पावसातही
    अगदी गुडघाभर पाण्यातून याच शूज ने साथ दिली.
    अगदी १० वर्षानंतरही
    त्याचा कपडा जीर्ण झाला, मात्र फाटला नाही आणि सोलही झिजले आहेत. ८००
    रुपयांत १० वर्षे म्हणजे फार झाले नाही का ?

    ReplyDelete